प्रतिनिधी: नासिक
कोरोना संसर्गजन्य आजाराने जागतिक आपत्ती ओढावल्याने केंद्र व राज्य सरकार आपातकालिन परिस्थितीत दिव्यांग व्यक्ती ची उपासमारहोऊ नये म्हणुन त्यांना जीवनावश्यक वस्तूं व शासकीय संजय गांधी निराधार योजना मानधन देऊन दिव्यांग व्यक्ती ची पुरेपुर काळजी घेत आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्य सरकारने तातडीने सर्व जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण आधिकारी यांना दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांनी दिव्यांग राखिव नीधी खर्च करण्यास सांगितले आहे, व नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग व्यक्ती ना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे
नाशिक, पांढुर्ली ग्रामपंचायत येथे दिव्यांग व्यक्ती ना संचारबंदी काळात अडचणींचा सामना करावा लागु नये म्हणुन शासनाचे आदेशानुसार राखिव दिव्यांग निधितुन पांढुर्ली गावातील 22 दिव्यांग व्यक्ती ना किराणा वस्तूंचे वाटप ग्रामपंचायतीचे ग्रामविकास आधिकारी श्री जालिंदर वाडगे साहेब यांचे हस्ते वाटप करण्यात आले, यात श्री वाडगे हे कर्तव्य दक्ष आधिकारी असुन त्यांना आदर्श कामगिरी केल्या बद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, हा दिव्यांग निधी तातडीने खर्च करण्यात पांढुर्ली ग्रामपंचायत अव्वल ठरली आहे, या बद्दल दिव्यांग कल्याण संघटना नाशिक चे अध्यक्ष श्री बबलु मिर्झा यांनी ग्रामविकास आधिकारी श्री जालिंदर वाडगे साहेब यांचे आभार मानले आहेत, गावातील दिव्यांग व्यक्ती ना लाभ मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे
या प्रसंगी सरपंच वैशाली भालेराव, ग्रामपंचायत,सदस्य पंढरीनाथ ढोकणे, तुषार मोजाड, ललिता माळी, गायत्री जाधव, व ग्रामस्थ सोपान दिवटे, बाळासाहेब पवार, विनोद भालेराव, विक्रम वाजे, रोहिदास दिवटे, सुनिल उगले आदी उपस्थित होते. लाभार्थी :-केशव हरिभाऊ दोंदे ,ज्ञानेश्वर हरिदास वाजे,मनोज बाजीराव चौगुले, अनिल बाळासाहेब वाजे चेतन त्रम्बक सोनुसे. आशा अनिल वाजे,भारती मनोज चौगुले,नामदेव पांडुरंग आडके,रमेश भिवाजी कवडे. या दिव्यांग व्यक्ती ना लाभ मिळाला.

