प्रतिनिधी : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परीवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर परस्पर हस्तांतरीत केल्या प्रकरणी तीन आरटीओ एजंट यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
आमदार संजय सावकारे यांची गाडी परस्पर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर करण्याचा अजब प्रकार समोर आला असून आरटीओ एजंट च्या माध्यमातून मोबाइल क्रमांक व इतर कागदपत्र बदली करून संजय सावकारे यांच्या नावावर असलेली कार MH19 CZ 5130 ही परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर करण्यात आली असल्या दरम्यान याप्रकरणी परिवहन विभागातील चार कर्मचाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात तीन आरटीओ एजंट यांनादेखील सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
