काय सुरु राहील
दि-6-5-2020
1. सर्व अत्यावश्यक दुकाने व ( ज्या दुकांनाना बंदी घालण्यात आलेली आहे असे दुकाने वगळून ) सर्व दुकाने ही सकाळी 09:00 ते दुपारी 03:00 वाजेपावेतोच सुरु राहतील .
2. सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये मालक व ग्राहकामध्ये तसेच ग्राहकांमधील अंतर कमीत कमी 6 फुटाचे अंतर असणे बंधनकारक आहे . एका वेळेस जास्तीत जास्त 5 व्यक्तींनाच परवानगी दिली पाहीजे .
3. घराबाहेर पडतेवेळी सर्वांना तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे . सार्वजनिक , कामाच्या ठिकाणी थुकन्यास पुर्ण पणे बंदी आहे . असे आढळुन आल्यास त्यांचेवर रु .500 / - दंडात्मक कारवाई करणेत येईल .
4. सर्व व्यक्तींना घराबाहेर पडतांना सोशियल डिस्टंसिंगचे पुर्ण पणे पालन करणे अनिवार्य आहे .
5. दुचाकी वाहनावर एकच व्यक्ती , तिन चाकी वाहनावर 2 + 1 व्यक्ती , चार चाकी वाहनामध्ये 2 + 1 व्यक्तींनाच प्रवास करता येईल . दुचाकीवर एक पेक्षा अधिक व्यक्ती आढळुन आल्यास त्यांचेविरुध्द दंडात्मक कारवाई करणेत येईल किंवा वाहन जप्त करण्यात येईल .
6. वरिल नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल व वारंवार नियम तोडणाऱ्या दुकानांवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येईल .
7 . 6 तारखेनंतर दुकाने खुली झाल्यानंतर मोठया प्रमाणात गर्दी झाल्यास कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने सर्वांनी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी व नियमांचे पुर्ण पणे पालन करणे आवश्यक आहे .
8. वयवृध्द लोकांनी ( वय 50 वरील ) , लहान मुलांनी , गरोदर महिलांनी अत्याआवश्यक गरजेसाठी ( उदा.दवाखाना इ . ) कामी बाहेर पडावे अन्यथा बाहेर पडु नये .
काय बंद असेल
.
अमळनेर तालुक्यामध्ये शाळा , कॉलेज , प्रशिक्षण केंद्र , कोचिंग क्लासेस , व्यायामशाळा , जीम , हॉटेल्स , आईस्क्रीम पार्लस , मजीद , मंदीर , समाज मंदीरे , मंगलकार्यालये , सलुन , ब्युटी पार्लर इत्यादी ठिकाणे ही बंद राहतील . 5. सायंकाळी 07:00 ते सकाळी 07:00 या कालावधीत संचारबंदी लागु राहील तरी अमळनेर तालुक्यातील सर्व जनतेस कळविणेत येते की , अनावश्यक बाजारामध्ये गर्दी करु नका , आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा अन्यथा घरात रहा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन उपविभागीय अधिकारी , अमळनेर व तहसिलदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.1

