![]() |
| नगरपरिषद दवाखाना (मुंबई गल्ली ) |
प्रतिनिधी :रामकृष्ण पाटील
एकीकडे अमळनेर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असतांना न.पा.आरोग्य विभागाने आरोग्य अधिकारी व कर्मचारी बेफिकीरीने वागत असल्याचे दिसत आहे. याबाबत सविस्तर व्रुतपत्र असे की.जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात कोरोनाच्या बाधित क्षेत्रात नागरी विभागातील अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविकांसह अन्य कर्मचारी सर्व्हेचे काम करत आहेत. ह्या कर्मचाऱ्यांना रोज सकाळी न.पा.दवाखान्यात बोलवले जाते आणि तेथून बाधित क्षेत्रात पाठवले जाते.त्याप्रमाणे आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ७.३० वाजता बोलविले होते.
अंगणवाडी कर्मचारी नेहमी प्रमाणे वेळेवर न.पा.दवाखान्यात पोहचल्या परंतु दवाखाना बंद होता. परिणामी ताटकळ रहावे लागले. आणि कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हते. यावरून न.पा.आरोग्य विभागाची बेफिकीरी लक्षात येते. वरिष्ठांना फोन केल्यावर संबंधित कर्मचारी उपस्थित झाले. अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका जिवाची पर्वा न करता कोरोनाचे काम करत आहेत. परंतु न.पा.आरोग्य विभाग याबाबत गंभीर नसून बेफिकीर व उदसिन असल्याचे दिसून येते. त्यामुळे भविष्यात कोरोनाचे रूग्ण वाढले तर जबाबदार कोण ? असाही प्रश्न उपस्थित होतो. न.पा.आरोग्य अधिकारी डॉ. विलास महाजन आणि आरोग्य कर्मचारी यांच्या कार्यपध्दती व वागणुकीबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी हि अनेक तक्रारी वरिष्ठांकडे केलेल्या आहेत.कालच प्रांताधिकारी यांनाही याबाबत संघटनेने तक्रार देऊन सविस्तर चर्चा केली आहे.असल्याचे समजते.

