अमळनेर नगरपरिषद यांना प्रहार अपंग क्रांती संघटने तर्फे निवेदन
प्रतिनिधी: नूर खान
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाकडून योग्य ती पाऊल वेळीच उचलली गेली आहेत. दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्या कडून लेखी आदेश देखील सर्व जिल्ह्यातील दिव्यांग निगडित विभागास पत्र पाठविले असून देखील अमळनेर नगरपरिषद कार्यालय यांच्या कडून दिव्यांगांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली किट देण्यास अमळनेर नगरपरिषद नि:समर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.
अमळनेर शहरात एकूण दिव्यांग संख्या किती याचा देखील आकडा नगरपरिषद यांच्या कडे नसून दिव्यांग बांधवांची युमिनीटी ही खूप कमी असल्याने आरोग्या च्या बाबतीत मात्र दिव्यांग बांधवांकडून नाराजगी व्यक्त होत आहे
कोरोना विषाणू पासून सावधगिरी बाळगावी व दिव्यांग बांधवांना आरोग्य किट हे तात्काळ उपलब्ध व्हावे या साठी प्रहार अपंग क्रांती संघटना अमळनेर यांच्या वतीने अमळनेर नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांची तीन दिवसांपासून अनुपस्थिती असल्याने उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या दालनात सोशल डिस्टसिंग पाळत बैठक घेण्यात आली यात प्रामुख्याने जे दिव्यांग बांधव हालचाल नाही करू शकत अश्या दिव्यांग बांधवांना आरोग्य किट चे वितरण हे घरपोच करण्यात यावे या साठी निवेदन देण्यात आले या प्रसंगी योगेश पवार प्रहार संघटना शहराध्यक्ष , नूर खान पठाण उपाध्यक्ष , प्रविण पाटील अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष, प्रा.जयश्री साळुंखे सामाजिक कार्यकर्त्या अमळनेर आदी उपस्थित होते.


