शिरपूर येथील गरजू गरिबांसाठी ३ शिवभोजन केंद्र खुले

शिरपूर येथे तीन शिवभोजन केंद्र गरजूंसाठी खुले !

 शिरपूर प्रतिनिधी :
येथील महाराजा कॉम्प्लेक्समधील पप्पाजी की थाली , कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शिवभोजन केंद्राचे तसेच मांडळ रस्त्यावरील मैदानावर शिवभोजन केंद्राचे उदघाटन आज करण्यात आले .

 तालुक्याचे आमदार काशीराम पावरा , लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ . जयश्रीबेन पटेल , उपनगराध्यक्ष भपेशभाई पटेल , प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल , तहसीलदार आबा महाजन , माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण , मुख्याधिकारी अमोल बागुल , बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया , नगरसेवक तपनभाई पटेल , गणेश साळवे , आमोदा तेलबिया सोसायटीचे व्हाईस चेअरमन यशवंत बाविस्कर , मोहन पाटील , मंडळ अधिकारी के . पी . खैरनार , राजेश भंडारी , सोनू सोनार , अशोक कलाल , सुनिल जैन , संजय चौधरी , भालेराव माळी , बालाभाई गजराथी आदी उपस्थित होते . आ . काशीराम पावरा म्हणाले की , कोरोनाच्या संकटाशी लढा देतांना सर्वांनी एकत्र यावे . आपल्या शेजारी कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी . गरजू लोकांबाबत प्रशासनाला सूचित करावे . नगराध्यक्षा सौ . जयश्रीबेन पटेल म्हणाल्या की , शिवभोजन थाळीचा लाभ घेतांना नियमांचे काटेकोर पालन करावे . सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आखलेल्या खुणांवर उभे राहावे . जेवणापूर्वी व नंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत , जेवतांना दोन खुर्व्यात पुरेसे अंतर ठेवावे , बाजारात अनावश्यक गर्दी करू नये . " पप्पाजी की थाली " येथे गेल्या काही वर्षांपासून गोरगरीब व गरजूंच्या सेवेसाठी चांगल्या जेवणाची व्यवस्था सुरूच आहे . यापुढे देखील शिवभोजन थाली 75 व्यक्तींसाठी पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर येणाऱ्या शेकडो लोकांना पप्पाजी की थाली येथील जेवणाचा लाभ देण्यात येईल . यासाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल , आमदार काशीराम पावरा व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या . तहसीलदार आबा महाजन म्हणाले की , गरजूंसाठी शहरात तीन केंद्रांवर प्रत्येकी 75 व्यक्तींना म्हणजेच एकूण 225 लोकांना दररोज पोटभर जेवणाचा लाभ दिला जाणार आहे . या केंद्रांसाठी भूपेशभाई पटेल व पालिकेने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले . यावेळी पप्पाची की थाली . बाजार समिती व मांडळ मैदानावरील तीनही शिवभजन केंद्रांवरील व्यवस्थेची पाहणी मान्यवरांनी केली . शिरपूर परिसरातील गोरगरीब व गरजू व्यक्तींसाठी ही व्यवस्था उपलब्ध करण्यात आल्याने आणण्यात सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे .