कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांचा साई निर्मल फाउंडेशनने अमळनेर येथील 11 व्यक्ती आणि एका संस्थेचा कर्मवीर 2020 पुरस्कार देऊन केला ई सन्मान
प्रतिनिधी भुसावळ - कोरोना विषाणूंच्या संक्रमणापासून स्वतःचा जीव धोक्यात घालून तहान भूक विसरून अहोरात्र परिश्रम करून आपणा सर्वांना वाचविणाऱ्या, कोरोना विषाणूचा समूळ नायनाट व्हावा म्हणून सेवा हेच कर्तव्य ही ब्रीद मनात ठेवून निस्वार्थपणे जनतेच्या संरक्षणासाठी त्याच्याशी दोन हात करणारे डॉक्टर्स, पोलीस प्रशासन, परिचारिका, आरोग्य सेवक, आशा सेविका, स्वच्छता कर्मचारी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटना, समाज सेवक, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, पत्रकार, विविध कंपन्या, उद्योगपती, राजकीय लोकप्रतिनिधी- कार्यकर्ते,शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या साऱ्या कोरोना विषाणूच्या कायम मुळासकट नायनाट करण्यासाठी लढा देणाऱ्या योद्ध्यांचा साई निर्मल फाउंडेशन भुसावळ तर्फे या हजारो सर्व वीर योद्धयाना कर्मवीर पुरस्कार2020 हा पुरस्कार ई – सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.यात अमळनेर शहरातील 11 शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी ,पत्रकार यांचा समावेश असून एका संस्थे ला ही हा सन्माम प्रदान करण्यात आला आहे.अमळनेर शहराचे कर्तृत्ववान तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,अमळनेर नगरीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,ठोस प्रहार संपादिका प्रा जयश्री दाभाडे, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताळे, पो ना शरद पाटील , नरेंद्र अर्जुन जाखेटे, ( रुग्णवाहीका चालक)नाना पाटील, (खाजगी रुग्णवाहीका चालक),
योगेश पवार प्रहार अपंग क्रांती संस्था व दिव्यांग शक्ती न्यूज ,परिचारिका योगिता कुलकर्णी,गोक्षेत्र प्रतिष्ठाण,अमळनेर संचलित श्रीमती भानूबेन बाबूलाल गोशाळा,पळासदडे रोड, अमळनेर यांना कर्मवीर 2020 कोरोना योद्धा या इ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.विश्व सेवा परमो धर्म यास आमच्या संस्थेच्या ब्रीद वाक्य नुसार आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो म्हणून सामाजिकतेची जाण आणि बांधिलकीची जपणूक करावी . तसेच या कोरोनाव्हायरस च्या लढ्यामध्ये लढणारे या सर्व वीरांच्या पंखामध्ये बळ व नवचैतन्य निर्माण व्हावे व त्यापासून इतरांना प्रेरणा म्हणून तेही या लढ्यात सहभागी व्हावेत या उदात्त हेतू आणि उद्देशाने साई निर्मल फाउंडेशन भुसावळ जिल्हा जळगाव महाराष्ट्र यांचे संस्थापक अध्यक्ष शिशिर दिनकर जावळे यांनी ही संकल्पना राबविली आहे.ही संकल्पना संपूर्ण शक्य तेवढ्या ठिकाणी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण सर्व स्तरावर वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. आपल्या देशात राज्यामध्ये गावात, शहरात, स्थानिक स्तरावर जे जे विविध स्तरावर तील, क्षेत्रातील लोक या दिव त्यानंतर संस्थेची कोर टीम प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना ई- सन्मान पत्राद्वारे सन्मानित करणार आले आहे.महाराष्ट्रात हा पहिलाच उपक्रम आहे.. यामुळे अधिकारी ,सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार, वैद्यकीय ,आरोग्य कर्मचारी यांचे मनोबल वाढणार आहे…

