प्रतिनिधी: निलेश वानखेडे
वावडे जवखेडा या गावात जवळ जवळ ६०- ७० लोकांच्या हातावर होम क्वारटाईन गृह विलगीकर्णाचे शिक्के मारले असले तरी देखील तेथील बाहेरून आलेले हे लोक कुठलीही कोरोना संक्रमनाची भीती न बाळगता गावात हिंडत असून गावात सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी गोळा करत असल्याचे स्थानिक रहिवाश्यांन कडून सांगण्यात येत आहे.
एवढेच नव्हे तर ज्या लोकांनी समाजात जागतिक महामारी कोरोना विषाणू बाबत जनजागृती करायला हवी तेच लोक लोकांचा घोळखा घेऊन गप्पा मारतांना दिसत असून गावातील प्रशासकीय यंत्रणा ही नाम मात्र असल्याचे आढळून आले आहे. वावडे गावात कोणत्याही गावाचा व्यक्ती येऊन गाव फिरू शकतो वावडे गावात रोज चे सुमारे ८०-९० रुग्ण बाहेर गावातून येतात .गावात पेट्रोलिक करणारी पोलीस व्हॅन देखील गावा बाहेरूनच फिरून जात आहे . म्हणूनच या सर्व प्रकरणाची माहिती पोलीस पाटील, सरपंच यांना दिली. मात्र त्यांना या विषयाचे कोणतही गांभीर्य लक्षात आलं नाही. तरी येथील स्थानिक रहिवाशी आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर संसर्ग पसरू नये म्हणून पोलीस अथवा होमगार्ड ची मागणी करत आहेत.

