प्रतिनिधी : नानभाऊ शिंदे
रावेर येथे झालेल्या दंगलीतील आरोपी नंदुरबार कारागृहात ठेवण्यात आले आहेत. जळगाव जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने तसेच कोरोनाचे संकट पाहता निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
रावेर न्यायालय व औरंगाबादच्या पोलीस उपमहानिरीक्षकांचा आदेशावरून जळगाव जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या रावेरच्या दंगलीतील ८० आरोपींची नंदुरबार वर्ग-१ कारागृहात रवानगी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ८० पैकी ४१ आरोपींना आज शुक्रवारी नंदुरबारच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. उर्वरित आरोपींना नंतर पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. कोरोनाचा पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आधीच दक्षता घेत आरोपींच्या स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला आहे. रावेर दंगलीतील ८० पैकी ४१ आरोपींना नंदुरबारला पाठवण्यासाठी जळगावचे पोलिस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तात्काळ गार्ड उपलब्ध करून दिल्याची माहिती जळगाव कारागृहाचे प्रभारी अधीक्षक मनीष गोसावी यांनी दिली

