प्रतिनिधी :अमळनेर
अमळनेरातील झामीचौक परिसरातील साळीवाडा भागातील दोघी रुग्ण करोना संक्रमीत (Positive ) असल्याची धक्कादायक बातमी आली आहे.
अमळनेरकरांनो सावधान कोरोना आला आपल्या दारी
2 दिवसापूर्वी मयत झालेल्या महिला व तिचे पती देखील संक्रमीत असल्याचे वैद्यकीय अहवाल आले आहेत.
प्रशासनाने 2 दिवसापूर्वीच योग्य ती काळजी घेत हा परिसर सील केलेला होता. आज अहवाल येताच अधिक कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती डॉ विलास महाजन यांनी दिली.
जनतेने घाबरून न जाता घर सोडून बाहेर जाऊ नये, स्वच्छता राखावी, मानसिक तंदुरुस्त राहावे, अफवा पसरवू नयेत असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन, डॉ राजेंद्र शेलकर, डॉ प्रकाश ताळे, डॉ जी एम पाटील यांनी केले आहे.
प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, मुख्याधिकारी विद्या गायकवाड, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी आदी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
अमळनेर शहरात एकूण कोरोना रुग्ण संख्या आता 3 झाली असून सर्वत्र काळजी व्यक्त होत आहे. हा भाग दाट वस्तीचा असल्याने विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोना आपल्या दारात आला असल्याने आता अधिक काटेकोर बंद पाळावा व सर्वानी आपापली काळजी घ्यावी असे आवाहन प्राशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

