किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल नंदुरबार शहरातील धक्कादायक प्रकार
नंदुरबार (प्रतिनिधी)
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील किराणा दुकानदाराने 'सोशल डिस्टन्स'च्या नियमांची पायमल्ली केल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील सुनिल प्रोव्हिजन दुकानासमोर अनिलकुमार हिरालाल गोंगिया यांना लेखी नोटीस देऊन देखील त्यांनी आपल्या किराणा दुकानाजवळ कोणत्याही प्रकारचे गोल मार्क न करता ग्राहकांची गर्दी करून माल विक्री करत असल्याने या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संजय वळवी यांच्या फिर्यादीनुसार किराणा दुकानदार अनिलकुमार हिरालाल गोंदिया यांच्याविरुद्ध भा.द.वि. कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या अधिक तपास पोलीस हवालदार चौरे हे करीत आहेत.

