प्रतिनिधी :मुंबई
ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या भरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार. विविध पदांच्या पदभरतीसाठी https://www.egrampanchayat.com या संकेतस्थळावर खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे कोणतीही पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही. व राज्यस्तरीय सरळसेवा निवड समिती अशा प्रकारची कोणतीही समिती ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त कार्यरत नाही. प्रकल्प व्यवस्थापक, ई-ग्रामपंचायत असे कोणतेही पद अस्तित्वात नाही. ही जाहिरात पूर्णत: खोटी आहे असे स्पष्ट झाले आहे.
या जाहिरातीच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची दिशाभूल करुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा करण्याचा प्रयत्न केला असता खोटी जाहिरात देणाऱ्याविरुद्ध पोलिसात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे या खोट्या जाहिरातीस कोणीही बळी पडू नये असे आवाहन मंत्रालयात ग्रामविकास विभागाने केले आहे.

