जळगाव जिल्ह्याची रेड झोन कडे वाटचाल- जिल्ह्यात अजून 3 कोरोन बाधित

प्रतिनिधी :राहुल पाटील

लॉकडाऊन अंतिम टप्यात येत असतांना जळगाव जिल्ह्यातील आता प्राप्त झालेल्या अहवालात जिल्हा  शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दि . २१ एप्रिल मंगळवार  रोजी कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आलेल्यानपैकी तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. 

या तीनही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. त्यामुळे शहरात  एकाच खळबळ उडाली आहे .या तीन रुग्णांमध्ये मलकापूर, जि. बुलढाणा येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर भुसावळ येथील ४३ वर्षीय महिला व अमळनेर येथील ४३  वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४  इतकी झाली असून यापैकी एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यु झाला असून उर्वरित १०  रुग्ण कोरोना संसर्ग कक्षात उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैंरे यांनी दिली.
त्यात अर्थ चक्राला गती मिळावी व लोकांचे हाल होऊ नये. म्हणून आज क्रांद्रीय गृह मंत्रालयाने काढलेल्या नियमानुसार लॉकडाऊन मध्ये थोड्या प्रमाणात काही अटी शर्तींवर आज दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली आहे.जळगाव जिल्हा रेड झोन कडे वाटचाल करू लागल्याने नागरिकांच्या मनात भीती व संभ्रमाचे चे वातावरण निर्माण झाले आहे. तरी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जोर  धरत आहे .