प्रतिनिधी :राहुल पाटील
जसजसी जनता लॉक डाऊन संपण्याच्या प्रतीक्षेत आहे त्या नुसार कोरोन बाधितांची संख्या कमी होण्या
ऐवजी दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे .
त्यावर रात्री उशिरा प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी
अहवालानुसार कोणीही घरा बाहेर पडू नये असे प्रसानामार्फत सांगण्यात येत आहे .
जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी ५६
व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.
यापैकी ५१ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ५ व्यक्ती कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आल्या आहेत.
कोरोना बाधित व्यक्तीमध्ये भुसावळ
येथील १५ वर्षीय मुलगा, अमळनेर येथील ५५ वर्षीय व्यक्ती, पाचोरा येथील ५६ वर्षीय, तर जळगाव येथील ३०
व ५७ वर्षीय पुरूषांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह
रूग्णांची एकूण संख्या ३७ झाली असून यापैकी १० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यातील
एक रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.
आता प्राप्त झालेल्या निगेटिव्ह अहवालातील ५१ व्यक्तींपैकी
१६ व्यक्ती या अमळनेरच्या, ६ व्यक्ती पाचोरा, ४ व्यक्ती भुसावळच्या तर उर्वरित जळगावच्या आहेत. अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

