जळगाव जिल्ह्यात आज बावीस कोरोना बाधित रूग्ण आढळले जिल्ह्यात एकूण संख्या 232 वर


जळगाव जिल्ह्यात आज  बावीस कोरोना बाधित रूग्ण आढळले
प्रतिनिधी :जळगाव  
जिल्ह्यात आतापर्यंत 232 कोरोना बाधित रूग्ण आढळले
जळगाव - जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, फैजपूर, चोपडा, अमळनेर, भडगाव, यावल येथील स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 56 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून बावीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 
  पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील दर्शन कॉलनीतील दोन, गेंदालाल मील एक, पवननगर भागातील एक असे चार, चोपडा येथील सात, अडावद येथील एक, भडगाव शहरातील चार व निंभोरा येथील एक, फैजपूर एक, यावल एक आणि अमळनेर येथील दोन अश्या एकूण बावीस रुग्णांचा समावेश आहे.  जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 232 इतकी झाली असून त्यापैकी पस्तीस व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर अठ्ठावीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.