जळगाव प्रतिनिधी :
जिल्ह्यात आज पुन्हा ५ कोरोना रूग्ण आढळून आले असून अशी माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी कोरोना चाचणीबाबतची माहिती एका प्रेसनोटच्या माध्यमातून जाहीर केली आहे. यानुसार जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वब घेतलेल्या ३८ कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी ३७ व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. तर ५ व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यात पॉझिटिव्ह आढळलेला ५० वर्षीय पुरूष हा यापूर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या समता नगर, जळगाव (मुळगाव चिंचोली, ता. बाळापूर, जि. अकोला) येथील महिलेचे वडील आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शेंदूर्णी येथील अकरा व्यक्तींचा समावेश आहे.
अमळनेरचे चार रुग्ण पॉझिटिव्ह झामी चौकातील रुग्णाच्या संपर्कातील २ व बोरसे गल्लीतील १ पुरुष तर कसाली मोहल्ल्यातील १ महिला पॉझिटिव्ह जिल्हात कोरोना पाॅझिटिव्ह संख्या ५७ झाली आहे.त्यापैकी १३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

