जून -जुलै मध्ये कोरोना सर्वाधिक प्रसार वाढणार असल्याचा AIIMS ने दिला इशारा.
संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्याची ही चिंता वाढवण्याचे संकेत.वृत्तसंस्था ..देशभरात कोरोना रुग्णांची संख्या पन्नास हजाराच्या पुढे गेले आहे 17 मे पर्यंत देशात लाँकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र लगेचच कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणार नाही याबाबत वारंवार तज्ञांकडून सांगितले जात आहे त्यामुळे जून-जुलै हे महिने कोरोनाचे सर्वाधिक धोकादायक महिने असतील असे वक्तव्य आय एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले आहे .
लाँकडाऊन वाढत असल्याने लोकांनमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे सर्व कामे आधी सुरू होणार याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे मात्र येत्या जून जुलैमध्ये कोरोना तरुणांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जून-जुलै हा कोरोनाचा पिक सीजन असेल असंही डॉ गुलेरिया यांनी यावेळी म्हटले आहे एका वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ गुलेरिया यांनी हा खुलासा केला.
दरम्यान त्यांनी लोकांना घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सांगितले देशात चाचण्या जास्त होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे काही ठराविक भागांमधूनच कोणाचे जास्त रुग्ण आढळून येत आहेत इतर ठिकाणी कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे देशात 80 ते 90 हजार टेस्ट केल्या जात आहेत. टेस्टच्या तुलनेत पॉझिटिव रुग्णांची संख्या 4ते4.5 टक्के इतकी आहे टेस्ट जास्त करीत असल्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे आम्ही रुग्ण संख्या वाढू नये यासाठी प्रयत्न करीत आहोत असे यावेळी डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.
डाँ. गुलेरिया पुढे म्हणाले की लाँकडाऊनचा चांगला परिणाम दिसून येत आहे इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे परिस्थिती चांगली आहे .लाँकडाऊनमुळे वेळ मिळाल्याने आम्ही अधिक तयारी केली आहे. जून-जुलैमध्ये कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी देशात व्हेंटिलेटर आणि आई सी यु मध्ये वाढ केली जात आहे. याशिवाय अधिक डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

