अमळनेर शहराने केले शतक (१००) पूर्ण आणखी ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले



प्रतिनिधी अमळनेर :
अमळनेर शहर कोरोना हॉसस्पॉट असून येथील संक्रमणाची साखळी तुटत नसून रोज च्या रोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. यात सदरील रुग्ण हे अंदरपुरा, कसाली, मरिमाता मंदिर, मढी चौक असे एरिया मिळून ३१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच अमळनेर तालुक्यातील चिंता अधिकच वाढली आहे.
काल पर्यंतच्या एकूण रुग्ण संख्या हि ६९ असून आज त्यात ३१ नविन रुग्णांची भर पडून एकूण शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०० झाली आहे. प्रशासनाकडून वारंवार सांगून देखील लोक कोरोनाला गांभीर्याने घेत नाही त्यात नागरिकांची व प्रशासनाची चिंता वाढली आहे.