प्रतिनिधी : जळगाव
जळगाव जिल्ह्यातील आज सायंकाळी
आलेल्या रिपोर्ट मध्ये जिल्ह्यात तब्बल ५५ संक्रमित रुग्ण आढळले असून यामुळे एकूण
रुग्ण संख्या ६७६ वर पोहचली आहे.
जळगाव जिल्हा माहिती
कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोट च्या माध्यमातून रुग्ण संख्येचे अपडेट दिले
आहेत या अपडेट नुसार आज सायंकाळी आलेल्या रिपोर्ट मध्ये जिल्ह्यात तब्बल ५५ कोरोना
संक्रमित रुग्ण आढळून आले असून यामुळे एकूण जिल्ह्यातील संख्या ६७६ वर पोहचली आहे.
यामध्ये अमळनेर येथील ११ ,
एरंडोल ३ , यावल ४ , रावेर ८ , भडगाव ५ भुसावळ १४ , जळगाव ग्रामीण २ , चोपडा ५ आणि
जामनेर १ अशा रुग्णांचा समावेश आहे तसेच २ रुग्णांचा पत्ता देण्यात आलेला नाही .
