शिरपूरहून मायदेशी परतणाऱ्या कामगाराची ई –पास च्या नावाने होतेय आर्थिक लुट


शिरपूर महसूल प्रशासनाला निवेदन देऊन केली कार्यवाहीची मागणी
प्रतिनिधी :महेंद्र पाटील 
रोजगार नसल्या अभावी घराकडे परत जाणाऱ्या मंजुरांच्या आर्थिक लुटीचे सत्र शहरात सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याने याबाबत आज शिरपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. ई -पासच्या नावाखाली सेतू केंद्रांने पैश्यांची चालवलेली लुट बंद करून चुकीची माहिती भरून दिल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई करून मिळणे बाबत निवेदन नायबतहसिलदार यांना देण्यात आले.या गंभीर प्रकारावर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवेदनात म्हटले की,आजची परिस्थिती पाहता शासनाने राज्यात अडकलेल्या परप्रांतीयांसाठी मोफत ई पास सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जेणे करून ते सुखरूप आपल्या गावी  परत जातील. मात्र त्या अडकलेल्यांची व्यथा न समजता ते लाचार असल्याचा फायदा घेऊन त्यांचा ई पास अर्ज भरून देण्यासाठी सेवेच्या नावाने मेवा उचलत आहेत. त्यांच्याकडून सेवेच्या नावाने वाट्टेल ती  फी आकारून २४ तास सेवादेत  कार्य करीत आहोत असे छातीठोकून सेवेकरी सांगतात. उत्तप्रदेश कानपुर येथील शिवम गुप्ता व त्यांच्या सोबत इतर १८ व्यक्तींची ई- पाससाठी अर्ज भरण्यासाठी सेवाव्रत सेतू केंद्रा वर तक्रारदार स्वप्नील  लखेसिंग  जाधव गेले असता त्यापैकी ४ व्यक्ती उत्तरप्रदेश जाणारे होते तर १४ व्यक्ती मध्यप्रदेश जाणारे होते. त्यासाठी एकुण २ अर्ज आहेत प्रती अर्ज १०० रुपये म्हणजेच २०० रुपये सांगण्यात आले, परंतु अर्ज पूर्ण होताच १८ व्यक्तींचे १८०० रुपये लागतील असे सेतुकेंद्र चालक यांच्या कडुन सांगण्यात आले. मात्र शिवम गुप्ता यांच्या कडे १२०० रूपये शिल्लक होते त्यातून १००० रूपये देऊन बाकीचे ८०० रूपये पास घेतांना देतो अशी विनंती करून तो तंटा मोडला.

पैश्यांच्या धुंदीत बेभान सेवाकार्य करणाऱ्यांनी एकच आयडी सामूहिक म्हणून दिले परंतू त्यात ४ पैकी एकाचेच नाव होते.मग बाकीच्या ३ व्यक्तींचे काय ? आणि या डोळेबंद सेवेकर्यांनी एकाची पास तर बनवुन दिली तीही उत्तरप्रदेश जाणाऱ्या व्यक्तींना मध्यप्रदेशची पास दिली !
 सेवेच्या नावाने चाललेले पैसे छापण्याचे कार्य करत असतांना त्यांना हे हि भान नाही की आपण तो व्यक्ती सुखरुप घरी कसा पोहोचेल तसा विचार न करता त्यांच्याशी आपल्याला काय आपली मेव्याची सेवा तर झाली ! या मेव्याची सेवा करण्याची दुकाने बंद करा जे माणुसकी शब्दावर काळोख पोहोचवून शिवम गुप्ता सारख्या लोकांचे नुकसान करीत आहेत. व त्यांचे सेवे खाली लुटमार करीत आहेत याबाबत कारवाई करण्यात यावी असे निवेदनावर लिहीण्यात आले. निवेदनावर स्वप्निल जाधव, आरीफ खान, शिवम गुप्ता यांच्या स्वाक्षरी आहेत.
तर या प्रकारात प्रशासनाचा देखील सहयोग असल्याची  चर्चा होत आहे. या गंभीर परिस्थिती कडे प्रशासन काय कारवाई करतात ?  हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.