शेवटी जान है तो जहान है !
प्रतिनिधी अमळनेर :
गेल्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक २२५ व्यक्तींचे नमुने घेतले गेले
असून त्यात परवा १८ आणि काल ७ अधिक २१
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत
रात्री उशिरा आलेल्या अहवालात सापडलेले २१ रुग्ण अमलेश्वर नगर, माळीवाडा आणि इस्लामपुरा भागातील आहेत.सदरील हॉसस्पॉट
एरिया पूर्णत: सील केला गेला असून सर्वाधिक चाचणी अमळनेर शहरात घेतली जात असल्याने
रुग्णांची संख्या अधिक भर पडतांना दिसत आहे. जळगाव जिल्हयातील ११४ रुग्णांपैकी ६७ रुग्ण हे अमळनेरचे झाले आहेत.
आज ९९ लोकांचे नमुने जातील आणि पुन्हा काल रात्री
सापडलेल्या २१ लोकांच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेतले जातील त्यामुळे
ही साखळी थांबवायची असेल तर स्वतः लॉक डाऊन व्हा . प्रशासकीय आदेशाचे काटेकोर पालन
करावे.

