जळगाव प्रतिनिधी: दि. ६ – संपूर्ण देश लॉकडाऊन असतांना त्यात जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या
वेगाने वाढत असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरातील स्वॅब घेतलेल्या ४३ कोरोना
संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी ३९ व्यक्तीचे
तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चार व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील ५९ वर्षीय पुरुष, अडावद, ता. चोपडा येथील ५८ वर्षीय पुरुष, नेहरुनगर, जळगाव येथील ७५ वर्षीय पुरुष तर
अमळनेर येथील ३६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत
कोरोना बाधित रूग्णांची संख्या ६६ इतकी झाली असून
त्यापैकी १३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर २ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी
माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

