प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय गृह सचिव प्रीती सुडान यांनी
दिलेल्या माहितीनुसार पूर्ण देशाचा परिस्थितीचा आढावा पाहून देशातील जिल्ह्यांचे
वर्गीकरण केले आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सरकारने
राज्यातील १४ जिल्ह्याचा समावेश रेड झोन मध्ये केला आहे तर १६ जिल्हे ऑरेंज झोन मध्ये आले आहेत तर उर्वरित ६ जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोन
मध्ये समावेश करण्यात आला आहे. दुसया टप्प्यातील
लॉकडाऊन ३ मे ला संपत असून तात्पुरत्या स्वरुपात सरकारने कोणत्या जिल्ह्यांना लॉकडाऊन मधून शिथिलता
देता येईल असे सर्व राज्याला कळवण्यात आले
आहे.
कोरोना विषयी संपूर्ण देशातील परिस्थिती बघता सर्वात जास्त जिल्हे हे उत्तर प्रदेशातील आहेत त्यात १९ जिल्ह्यांचा समावेश करात आला आहे. तर दुसरा नंबर महाराष्ट्र
राज्याचा लागला आहे, तिसरा नंबर तामिळनाडूचा आहे. ३ मे २०२० रोजी
लॉकडाऊन लागू करून ४० दिवस पूर्ण होणार
आहेत. लॉकडाऊन मुळे मोठे संपूर्ण देशातील आर्थिक परिस्थिती पूर्णत थांबली असून या दुहेरी
परिस्थितीतून मार्ग काढाण्यासाठी शासनाने रेड ,ऑरेंज व ग्रीन असे झोन मध्ये
वर्गीकरण करून लॉकडाऊन शिथिलव्हावा असा आदेश काढण्यात आला आहे. रेड ,ऑरेंज व ग्रीन झोन मधील जिल्ह्यांच्या हद्दी
निश्चित केल्या असाव्यात व प्रत्येक जिल्ह्याने आपली चढ उतार स्थिती केंद्राला
कळविणे आवश्यक आहे.
जोपर्यंत लगातार २१ दिवस ज्या जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण
सापडणार नाही तो पर्यत त्या जिल्ह्याला ग्रीन झोन समजले जाणार नाही असे स्पष्ट
केले असून शासनाने जाहीर केलेल्या यादीत संपूर्ण देशातील १३० जिल्हे रेड झोन
मध्ये, २८४ जिल्हे ऑरेंज झोन तर ३१९ जिल्हे ग्रीन झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले
आहे.जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्र व तालुका क्षेत्र अशी
विभागणी करून ज्या क्षेत्रात मागील २१ दिवसात एकही कोरोन बाधित रुग्ण सापडणार नाही
अश्या क्षेत्राचा दर्जा कमी करता येणार आहे लॉकडाऊन संदर्भातील पुढील माहिती व
नियम 3 मे २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. महाराष्ट्रातील जिल्ह्या प्रमाणे
वर्गीकरण पुढील प्रमाणे:
रेड झोन : जळगाव, धुळे, अकोला, नाशिक, औरंगाबाद,
पुणे ,मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, सातारा, सोलापूर, नागपूर आणि यवतमाळ.
ऑरेंज झोन : बीड, भंडारा, सांगली, रायगड,
अहमदनगर, अमरावती, लातूर, परभणी, चंद्रपूर, जालना, नांदेड, कोल्हापूर, रत्नागिरी,
बुलढाणा, नंदुरबार आणि हिंगोली.
ग्रीन
झोन : गडचिरोली , वाशीम, सिंधुदुर्ग, गोंदिया, वर्धा आणि उस्मानाबाद.
जोपर्यंत लगातार २१ दिवस ज्या जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण सापडणार नाही तो पर्यत त्या जिल्ह्याला ग्रीन झोन समजले जाणार नाही असे स्पष्ट केले असून शासनाने जाहीर केलेल्या यादीत संपूर्ण देशातील १३० जिल्हे रेड झोन मध्ये, २८४ जिल्हे ऑरेंज झोन तर ३१९ जिल्हे ग्रीन झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्र व तालुका क्षेत्र अशी विभागणी करून ज्या क्षेत्रात मागील २१ दिवसात एकही कोरोन बाधित रुग्ण सापडणार नाही अश्या क्षेत्राचा दर्जा कमी करता येणार आहे लॉकडाऊन संदर्भातील पुढील माहिती व नियम 3 मे २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. महाराष्ट्रातील जिल्ह्या प्रमाणे वर्गीकरण पुढील प्रमाणे:
रेड झोन : जळगाव, धुळे, अकोला, नाशिक, औरंगाबाद, पुणे ,मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, सातारा, सोलापूर, नागपूर आणि यवतमाळ.
ऑरेंज झोन : बीड, भंडारा, सांगली, रायगड, अहमदनगर, अमरावती, लातूर, परभणी, चंद्रपूर, जालना, नांदेड, कोल्हापूर, रत्नागिरी, बुलढाणा, नंदुरबार आणि हिंगोली.
ग्रीन झोन : गडचिरोली , वाशीम, सिंधुदुर्ग, गोंदिया, वर्धा आणि उस्मानाबाद.

