जळगाव (प्रतिनिधी)
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज पुन्हा नवीन ४४ कोरोना बाधित रुग्ण
सापडल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव ५, अमळनेर १०,
रावेर ६, एरंडोल १, फैजपूर १,भडगाव १, जामनेर २, भुसावळ ५,
चोपडा ९, चाळीसगाव २, धरणगाव ४ असे एकूण ४४ कोरोना
पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित
रूग्णाची संख्या १००१ इतकी झाली असून जळगाव जिल्ह्यात
आतापर्यंत ११५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान,
आजच्या आकडेवारीतून अमळनेर आणि चोपडा तालुक्यांमध्ये
संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. अमळनेर शहरात मध्यंतरी परिस्तिथी आटोक्यात तर जिल्ह्यातील रुग्ण संख्या १००१ वर होती.
परंतु अलीकडच्या काळात आधी
प्रमाणेच रूग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क
झाल्या आहेत. तर चोपडा तालुक्यातील कोरोना बाधीतांचे प्रमाण
देखील आता चिंताजनक झाल्याचे दिसून येत आहे.
तथापि नागरिकांनी विषयाचे गांभीर्य बघता महत्त्वाचे काम असल्यावर घरा बाहेर पडा अन्यथा घरीच रहा सुरक्षित रहा असे आवाहन लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून केले जात आहे.
