प्रतिनिधी :अमळनेर
हतनूर धरणातून सायंकाळी 4 वाजता 69 हजार क्युसेक्स विसर्ग होत असून हा प्रवाह सारंगखेडा बॅरेज येथे 16 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोहोचणार असून तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 24 तासात तापी नदी पात्रातील पाणीच्या पातळीत भरपूर वाढ होणार असल्याने दोन्ही बॅरेजसची पाणी पातळी नियंत्रणाच्या पातळीपर्यंत कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 24 तासासाठी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

