केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नाईट ड्यूटी अलाऊंस देण्याचा केंद्राचा निर्णय


नवी दिल्ली । केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींना मान्यता दिली असून नवीन व्यवस्थेनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना रात्र पाळी भत्ता अर्थात नाईट ड्यूटी अलाऊंस देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. 1 जुलैपासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत   कर्मचायांना विशेष ग्रेड पेच्या आधारे नाईट अलाऊंस मिळत होता. परंतु आता नवीन व्यवस्थेनुसार, नाईट अलाऊंसमुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून वेतनाही वाढ होईल. असा ठरतो नाईट अलाऊंस नाईट ड्यूटीवेळी प्रत्येक तासासाठी 10 मिनिटांचं वेटेज देण्यात येईल. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत केलेलं काम हेच नाईट ड्यूटी म्हणून मानलं जाईल, असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. 

नाईट ड्यूटी अलाऊंससाठी बेसिक पे सीलिंग वेतन मर्यादा 43 हजार 600 रुपये प्रति महिना या आधारावर निश्चित केली गेली आहे. 

     अर्थात मूलभूत इतका मिळेल अलाऊंस हा नाईट अलाऊंसचा दर तासाच्या आधारे दिला जाईल, जो 200 ने विभाजित केलेल्या मूलभूत वेतन आणि महागाई भत्त्याच्या (BP+DA/200) बरोबरीचा असेल. सातव्या वेतन आयोगाच्या आधारे मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता ठरवला जाईल. हाच फॉर्म्युला सर्व मंत्रालयं आणि विभागातील कर्मचाऱ्यांना लागू होईल.