राज्यात लॉकडाऊन काळात आवाजवी वीजबिलांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या या बैठकीत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. यावेळी 'ग्राहकांना कशी वाढीव पद्धतीने बिलं आली ते वीज कंपन्यांच्या अधिकार्यांना आम्ही सांगितले आहे. वाढीव वीजबिलाच्या तक्रारी ही वस्तुस्थिती असून ग्राहकांना दिलासा मिळालाच पाहिजे अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.
राज्य सरकारकडून जर हा निर्णय घेण्यात आला तर एकूण ७३ लाख घरगुती वीज ग्राहकांपैकी ९३ टक्के वीज ग्राहकांना ही सूट मिळेल. ही देताना जानेवारी ते मार्च महिन्यातील वीज युनिटचा विचार केला जाणार आहे. राज्य सरकार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला (MERC) याबाबतचा प्रस्ताव देईल. MERC ने जर सरकारचा हा प्रस्ताव मंजूर केला तर त्यानंतर पुढील मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव आणण्यात येईल.

