कोरोनासे डर नही लागता साहब....पावती से लागता है...विना मास्क नागरिकांकडून प्रतिक्रिया
प्रतिनिधी :अमळनेर
शहरात व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून 30 एप्रिल पर्यंत मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आला असतानादेखील शहरात कडकडीत बंद असतांना काही नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होतांना आढळून येत आहे. आज दि.11 एप्रिल रोजी अर्बन बँक समोरील शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये डी वाय एस पी राकेश जाधव यांनी सुरू असलेल्या दुकानांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच विना मास्क व विना कारण फिरणाऱ्यांवर देखील दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. नगरपरिषद अतिक्रमण पथक प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या पथकाने शहरातील हॉटेल रुपाली 2000 रु, कादरी मटण शॉप 2000रु, मोहसील बागवान 500रु, निलेश सूर्यवंशी,दिलीप हातगडे, पंकज पाटील, जयदीप साळुंके,विजय पाटील, राज जैन, ओंकार पाटील, मनोज ढिवरे, गणेश नेरकर आदींवर 200 रु. प्रमाणे एकूण 6300 सहा हजार तीनशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

